Lockdown

चला चला आवरा पटपट. कॅब बोलावली आहे ना एरपोर्टवर जायला. मी पटकन बॅग उचलली आणि ..... इतक्यात मला जाग आली. जाणवल कि हे स्वप्न होत. Covid-१९ च्या lockdown च्या काळात पडलेलं स्वप्न. आता प्रवास म्हणजे स्वप्नात बघायची वेळ एखादे वर्षासाठी तरी आपल्यावर आली आहे. ज्यावेळी मी सुरवातीला चायना मधील लोकांचे मास्क घातलेले फोटो, बातम्या पाहायचे तेव्हा वाटायचं हा रोग काही आपल्यापर्यंत येणार नाही. पण जेव्हा आम्ही राहतो तिथला पुढचा चौक सील केला तेव्हा त्या दिवसाची पुन्हा आठवण झाली. T.V.वार त्याच त्याच बातम्या अखंड पानोपानी व्यापलेल वर्तमानपत्र हे सगळं उदास करणार आहे खर. चार पाच केसेस ऐकता ऐकता आता लाखाचा आकडा पार झाला. Lockdownच्या सुरवातीला Janata curfew पुकारला गेला तेव्हा वाटलं नव्हतं कि आता इथून पुढे ६० दिवस आपण असेच घरात बसून राहणार आहोत. खिडकीतून बाहेर बघण्याएवढाच काय तो आपला बाहेरच्या वातावरणाशी संबंध येणार आहे. आधी गाड्या बंद ,मग कंपन्या बंद, मग संचारबंदी अस एक एक करून Lockdown ने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. एक दिवस बातमी आली covid-१९ भारतात आला, पुण्यात आला आणि भीतीने कोरड पडली. रोज बाहेर पडणारे, मनमुराद फिरणारे ,एकही दिवस घरात पाय न थांबणारे तरुण ,बसथांब्यावर मन रमवणारे जेष्ठ, बागेत खेळणारे बाल सगळे आपल्या घराच्या वळचणीला अनामिक भीती मनात घेऊन विसावले. कंपन्या ,शाळा ,चित्रपटगृह ,मॉल आणि रस्ते सगळं ओसाड पडलं. रस्ते गाडयांना miss करू लागले किंवा एवढ्या काळानंतर त्यांना मिळालेल्या ब्रेकमुळे त्यांनी उसासा टाकला असणार. जग पुन्हा पंचवीस वर्ष मागे गेल्या सारखं वाटायला लागलं. शाळा मुलांना miss करू लागली. त्यांची किलबिल ऐकू येईनाशी झाली. सगळे आपापल्या घरट्यात. त्यांना तर lockdown चा अर्थही माहित नाही. पण आपले आई बाबा आता आपल्या बरोबर घरीच थांबणार आहेत या विचारानेच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. वाहनांच्या आवाजाने झोपमोड होण्यापेक्षा पक्षांच्या किलबिलाटाने येणारी जाग छान वाटू लागली. बाहेरच वातावरण हळू हळू बदललं. आणि मग भारतही कसा इतर देशांपेक्षा देखणा दिसतो याचे फोटो whatsapp वर येऊ लागले. प्रदूषण नसताना भारत कसा सुंदर दिसतो हे पाहून नवल वाटायला लागले. माणूस हा समाजप्रिय प्राणी, त्याला इतका एकांत तो काय सोसावा. मग आपले नातेवाईक ,मित्र ,मैत्रिणी यांच्याशी व्हिडिओ कॉल सुरु झाले, त्यात रमण चालू झालं. whatsappchallenges झाले. सोशल मीडिया वरतर या सगळ्या गोष्टींचा पूर आला, सोशल मीडिया ला जणू covid ने व्यापून टाकलं . Fashion वालेही मागे राहिले नाहीत, त्यांनी कपड्यांबरोबर matching मास्क बनवायला सुरुवात केली. माझ्यासाठी तर lockdownम्हणजे निसर्गाने लोकांना त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला दिलेली एक संधीच. चिमणी मुले घरातही खुश राहू लागली ,जेष्ठही आपल्या मुलांबरोबर वेळ घालू लागले. लोकांनी आपापल्या छंदासाठी वेळ काढायला सुरवात केली. मग कोणी नवनवीन रेसिपी करू लागले. कधीही स्वयंपाक घरात न येणारा नवरा पदार्थ स्वतःहून बनवू लागला. नेहमी व्यस्त असणारी मुले आईला कामात मदत करू लागली. लोक online मुंजी, बर्थडे साजरे करू लागले. आता हे सगळं अंगवळणी पडायला हव हे कळायला लागलं. बाहेरून आल्यावर हात धुणे, पाय धुणे हे सगळं जीवनाचा भाग बनायला लागलं. Social distancing ला पर्याय नाही हे उमगायला लागलं. Lockdown आणि covid ने आतापर्यंत जगलेल जीवन वेगळ्या पद्धतीने जगायला शिकवलं . जरी सगळ्यांनी lockdown ला adjust केलं स्वतःला बदलल, तरी पुन्हा परत जाणारे मजूर त्यांची होणारी उपासमार पाहून घालमेल व्हायला लागली. हे सगळं भूतो ना भविष्यती होत यात काही शंका नाही. आता लवकरच सगळं ओपन होत आहे, आपण आपली काळजी तर घेतच आहोत. यावर vaccine निघून आपण यातून बाहेर पडूही. रात्री नंतर दिवस तर असणारच या विचाराने पुन्हा कामाला लागू, स्वतःला motivate करू. माणसाला तसा हा निसर्गाचा उद्रेक नवीन नाही. पूर्वीही अश्या साथी आल्या आणि गेल्या, माणसाने बुद्धीच्या जीवावर त्यावर विजय मिळवला. तो लढणार, हरवणार, covid-१९ ला हरवणार. तुमच्या आमच्यातला प्रत्येक जण जिंकणार आणि नक्कीच जिंकणार !!!!

 Shreya 

Comments

Popular posts from this blog

Unlock1.0