Posts

Showing posts from June, 2020

Unlock1.0

Unlock1.0 Lockdown open व्हायला सुरवात झाली. मोठी नियमावली बातम्यांमधे दाखवायला सुरवात झाली.वर्तमानपत्रात काय allowed काय notallowed याची वर्णने येऊ लागली. रस्त्यावर उतरलेले जंगली प्राणी पुन्हा जंगलात वापस फिरू लागले कारण या जगाचा स्वतःला राजा समजणारा माणूस पुन्हा घराबाहेर पडू लागला . तोंडावर mask, काही जणांच्या हातात हातमोजे आणि चेहऱ्यावर अजूनही भीती. पण वाहनांचे आवाज सुरु झाले , ४ व्हिलर मधेही चार नाहीतर निदान दोन डोकी दिसू लागली. रस्ते हळू हळू पूर्ववत होऊ लागले. मास्क लावून माणूस बाहेर पडला. अजून covid वर ठोस अस औषध नाही की लस नाही . पण बस आता ठरलं म्हणजे ठरलं अस म्हणत तुमच्या माझ्यासारखं तीन महिने घरात बसून कंटाळलेला तो किंवा ती कधी भाजी आणायला ,वाण्याच्या दुकानात तर कधी सोसायटी मध्ये चक्कर मारायला बाहेर पडू लागले . अजूनही चिमुकले घरातूनच डोकावतात कधी तरी आई बरोबर बाहेरची हवा फक्त सुंगूनच घरी परततात . पण जेष्ठ नागरिक मात्र धिटाईने बस स्टॉप वर दिसायला लागले. त्यांची उलटी पडलेली बाकडी सुलटी झाली आणि मास्क घालून पांढऱ्या डोक्याचे आजोबा मास्क मधेच खदाखदा हसून मित्रांशी गोष्टी करू ल