Unlock1.0

Unlock1.0 Lockdown open व्हायला सुरवात झाली. मोठी नियमावली बातम्यांमधे दाखवायला सुरवात झाली.वर्तमानपत्रात काय allowed काय notallowed याची वर्णने येऊ लागली. रस्त्यावर उतरलेले जंगली प्राणी पुन्हा जंगलात वापस फिरू लागले कारण या जगाचा स्वतःला राजा समजणारा माणूस पुन्हा घराबाहेर पडू लागला . तोंडावर mask, काही जणांच्या हातात हातमोजे आणि चेहऱ्यावर अजूनही भीती. पण वाहनांचे आवाज सुरु झाले , ४ व्हिलर मधेही चार नाहीतर निदान दोन डोकी दिसू लागली. रस्ते हळू हळू पूर्ववत होऊ लागले. मास्क लावून माणूस बाहेर पडला. अजून covid वर ठोस अस औषध नाही की लस नाही . पण बस आता ठरलं म्हणजे ठरलं अस म्हणत तुमच्या माझ्यासारखं तीन महिने घरात बसून कंटाळलेला तो किंवा ती कधी भाजी आणायला ,वाण्याच्या दुकानात तर कधी सोसायटी मध्ये चक्कर मारायला बाहेर पडू लागले . अजूनही चिमुकले घरातूनच डोकावतात कधी तरी आई बरोबर बाहेरची हवा फक्त सुंगूनच घरी परततात . पण जेष्ठ नागरिक मात्र धिटाईने बस स्टॉप वर दिसायला लागले. त्यांची उलटी पडलेली बाकडी सुलटी झाली आणि मास्क घालून पांढऱ्या डोक्याचे आजोबा मास्क मधेच खदाखदा हसून मित्रांशी गोष्टी करू लागले. अजून पार्लर आणि सलून उघडे नाहीत त्यावर WhatsApp विनोद सुरु झाले. काहींनी trimmer आणून केस कापण्याचा अयशस्वी प्रयोग करून शेवटी चकोटच केले. बायका घरीच चेहऱ्यावर लेप लावून दिसू लागल्या .काकूंच्या recipes संपून रोजचा स्वयंपाक सुरु झाला. काही कंपन्या सुरु झाल्या आणि काका लोक मास्क लावून कंपनी युनिफॉर्म मध्ये कंपनीच्या बस ची वाट पाहताना दिसू लागले. अजून देव मात्र देवळातूनच हे सगळं पाहत आहेत. या काळात मास्क म्हणजे एक अविभाज भाग होऊन गेला. जाहिरातींमध्येही मधेही कलाकार मास्क लावून दिसू लागले. चिमुकले doremon चे तर तरुणी रंगी बिरंगी मास्क घालून बाहेर पडले. गाड्या वाढल्या. पोलीस काकांची ड्युटी फक्त containment zone पुरती मर्यादित झाली. पण हे सगळं चालू झाल आणि cases चा आकडा मात्र फुग्यासारखा फुगायला लागला. कलिंगडासारखे बाहेरून ग्रीन असलेले ग्रीन zone रेड व्हयायला लागले. इकडे इतक्या beds ची व्यवस्था तिकडे इतक्या beds व्यवस्था, वेंटीलेटर्स ची व्यवस्था सगळं ऐकून घाबरायला व्हायला लागलं. मग मनाला विचारायला लागले “आपण गर्दीत जातो का नाही मग containment मध्ये जातो का नाही, सगळे follow तर करतो फिर काहे का डरना”. अस म्हणता म्हणता शेजारच्या सोसायटीत patient निघायला लागले. मग फ्लॅट सील व्हायला लागले कि दोन दिवस सगळं चिडीचूप . पुन्हा सगळं पूर्ववत जणू लोकांनी आता ठरवलंय " जो भी होगा देखा जायेगा " मग रोज नवीन औषधांचे दावे कधी रामदेव बाबा, कधी आयुष्य, कधी होमिओपॅथी, कधी जर्मनीत कधी जपान मध्ये एक ना अनेक. एवढ्या सगळ्या शोधानंतरही अजून आकडा मात्र खाली नाही. पण recovery rate वाढतोय हाच काय तो दिलासा. सोसायटीत फिरण्याऱ्या जोड्या वाढल्या ,बायकांचे हास्याचे फुलारे फुलायला लागले. Ptluck सुरु झाले. आणि जवळच्या सोसिटीत बातमी आली कि पुन्हा चार दिवस शांतता. हे सगळं नॉर्मल व्हायला किती दिवस लागणार आहेत देवच जाणे असे उसासे . तर ज्योतिषी लोकांच्या रोजच्या तारखा. बाकीची संकट चालूच कधी cyclone, कधी भूकंप आणि carona तर आमच्या राशिलाच पुरलाय हि तक्रार. खाजगी कंपन्यांची चाके फिरू लागली ,मजूरही माघारी फिरले, बिल्डिंग बांधकाम पुन्हा सुरु झाले आणि देश खरंच आत्मनिर्भर व्हायला लागला की काय ठाऊक नाही. पण मला तर अजूनही उघडलेल्या दुकानं मध्ये पूर्वीची वर्दळ दिसत नाही ,मास्क पलीकडे ते फुलणार हास्य दिसत नाही आणि खर सांगायचं तर माणसांनी बाहेर पडायचा निर्धार केला या पलीकडे काही बदलेल दिसत नाही. केसेस तर lockdown पेक्ष्या हि वाढल्या, आता घरीच treatment द्यायची वेळ येऊ लागली .गाडीत बसून बाहेर पडलं तरी social distancing च्या overdose ने दुसऱ्या गाडीजवळून जायलाही नको वाटायला लागलं .पण अजून चार पाच महिने तरी हेच new normal.. हेच खरं!!!!
                                                                         श्रेया  

Comments

Popular posts from this blog

Lockdown