Posts

Lockdown

चला चला आवरा पटपट. कॅब बोलावली आहे ना एरपोर्टवर जायला. मी पटकन बॅग उचलली आणि ..... इतक्यात मला जाग आली. जाणवल कि हे स्वप्न होत. Covid-१९ च्या lockdown च्या काळात पडलेलं स्वप्न. आता प्रवास म्हणजे स्वप्नात बघायची वेळ एखादे वर्षासाठी तरी आपल्यावर आली आहे. ज्यावेळी मी सुरवातीला चायना मधील लोकांचे मास्क घातलेले फोटो, बातम्या पाहायचे तेव्हा वाटायचं हा रोग काही आपल्यापर्यंत येणार नाही. पण जेव्हा आम्ही राहतो तिथला पुढचा चौक सील केला तेव्हा त्या दिवसाची पुन्हा आठवण झाली. T.V.वार त्याच त्याच बातम्या अखंड पानोपानी व्यापलेल वर्तमानपत्र हे सगळं उदास करणार आहे खर. चार पाच केसेस ऐकता ऐकता आता लाखाचा आकडा पार झाला. Lockdownच्या सुरवातीला Janata curfew पुकारला गेला तेव्हा वाटलं नव्हतं कि आता इथून पुढे ६० दिवस आपण असेच घरात बसून राहणार आहोत. खिडकीतून बाहेर बघण्याएवढाच काय तो आपला बाहेरच्या वातावरणाशी संबंध येणार आहे. आधी गाड्या बंद ,मग कंपन्या बंद, मग संचारबंदी अस एक एक करून Lockdown ने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. एक दिवस बातमी आली covid-१९ भारतात आला, पुण्यात आला आणि भीतीने कोरड पड

Unlock1.0

Unlock1.0 Lockdown open व्हायला सुरवात झाली. मोठी नियमावली बातम्यांमधे दाखवायला सुरवात झाली.वर्तमानपत्रात काय allowed काय notallowed याची वर्णने येऊ लागली. रस्त्यावर उतरलेले जंगली प्राणी पुन्हा जंगलात वापस फिरू लागले कारण या जगाचा स्वतःला राजा समजणारा माणूस पुन्हा घराबाहेर पडू लागला . तोंडावर mask, काही जणांच्या हातात हातमोजे आणि चेहऱ्यावर अजूनही भीती. पण वाहनांचे आवाज सुरु झाले , ४ व्हिलर मधेही चार नाहीतर निदान दोन डोकी दिसू लागली. रस्ते हळू हळू पूर्ववत होऊ लागले. मास्क लावून माणूस बाहेर पडला. अजून covid वर ठोस अस औषध नाही की लस नाही . पण बस आता ठरलं म्हणजे ठरलं अस म्हणत तुमच्या माझ्यासारखं तीन महिने घरात बसून कंटाळलेला तो किंवा ती कधी भाजी आणायला ,वाण्याच्या दुकानात तर कधी सोसायटी मध्ये चक्कर मारायला बाहेर पडू लागले . अजूनही चिमुकले घरातूनच डोकावतात कधी तरी आई बरोबर बाहेरची हवा फक्त सुंगूनच घरी परततात . पण जेष्ठ नागरिक मात्र धिटाईने बस स्टॉप वर दिसायला लागले. त्यांची उलटी पडलेली बाकडी सुलटी झाली आणि मास्क घालून पांढऱ्या डोक्याचे आजोबा मास्क मधेच खदाखदा हसून मित्रांशी गोष्टी करू ल